---Advertisement---

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024; सरकारकडून वयोवृद्धांना ‘खास भेट’, सरकार ज्येष्ठांसाठी लवकरच आणणार योजना नवीन योजना ; जाणून घ्या सविस्तर माहिती…!!

By
On:
Follow Us

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024: नमस्कार मित्रांनो,‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’नंतर आता महाराष्ट्र सरकारनं ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना 2024 (Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024) जाहीर केली आहे. मित्रांनो या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिक म्हणजेच साठ वर्षावरील नागरिकांना देशभरातील तब्बल 66 तीर्थक्षेत्रांना त्यांना भेटी देण्यासाठी सरकारी योजना ची तयारी करत आहे.अनेक वर्षापासून कुठे न गेलेले अध्यक्ष नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30000 पर्यंत अनुदानही सरकार देणार आहे तूर्तास फक्त या ठिकाणी योजना जाहीर करण्यात आली आहे यासाठी लवकरच संकेतस्थळ तयार करून त्यावर अर्ज सुरू होतील याचे सर्व सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटवर तुम्हाला कळवण्यात येईल.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.

हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे याचे आम्हाला समाधान आहे, निश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल.Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024: मित्रांनो,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये लाभार्थी हा महाराष्ट्रचा रहिवासी असणे अनिवार्य असणार आहे तसेच त्याच्या घरात चार चाकी वाहन असल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. लाभार्थीचे वय हे साठ वर्षे वरील म्हणजे ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहे. लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसलेले पाहिजे. लाभार्थीच्या कुटुंबातील कोणीही आमदार किंवा खासदार नसावेत.Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या अटी-शर्ती काय ?

▶ लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

▶ घरात ट्रॅक्टर सोडल्यास जर चार चाकी वाहन असल्यास अशा ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही.

▶ वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.

▶योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे

▶ या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नसावेत.

या योजनेमध्ये लाभार्थींना निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाला यात्रेकरूंना भेट देता येणार आहेत याची नोंद घ्यावी.

▶ प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये कमाल मर्यादा आहे.Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024

What Are Provisions Under CM Tirtha Darshan Yojana?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत तरतूदी काय?

शासनातर्फे प्रकाशित झालेल्या या योजनेमध्ये शासनातर्फे महाराष्ट्र राज्य व भारत देशातील अनेक तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. तेथे संपूर्ण देश त्यांना भेट देण्यासाठी योजना आणली आहे. तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट ‘अ’ आणि ‘ब’ प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळं कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढदेखील होऊ शकते. प्रकाशित झालेल्या या योजनेमध्ये सदर योजनेअंतर्गत अनेक तीर्थस्थळांपैकी निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच तीर्थस्थळाच्या यात्रे करिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच या योजनेअंतर्गत प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी असणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजनाची व्यवस्था निवासाची उत्तम सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

Eligibility Required for CM Tirtha Darshan Yojana?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 सुरू करण्यासाठी काय पात्रता आवश्यक?

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक
  • वय वर्ष 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक
  • योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे

What Documents Are Required for CM Tirtha Darshan Yojana?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक?

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • लाभार्थ्याचे आधार कार्ड/रेशनकार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.)सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणं अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र.

How And Where to Apply for Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 साठी अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • सदर योजनेचे अजून वेबसाईट तयार झाली नाही आहे त्यामुळे तयार झाल्यानंतर या योजने संबंधित तुम्ही संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्र दारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
  • या योजनेमध्ये पात्र जेष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहेत.
  • जर समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन फॉर्म भरता येत नसेल तर त्यांनी अर्ज भरण्याची सुविधा ही केंद्रात उपलब्ध करण्यात आलेली आहे तिथे जाऊन भरता येणार आहेत.
  • अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  • प्रकाशित झालेल्या या योजनेमध्ये सदर योजनेअंतर्गत अनेक तीर्थस्थळांपैकी निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच तीर्थस्थळाच्या यात्रे करिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच या योजनेअंतर्गत प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी असणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजनाची व्यवस्था निवासाची उत्तम सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी.

समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील :-

(१) सदर योजनेचे देखरेख व संनियंत्रण करणे.

(२) सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे.

(३) सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेवून आवश्यक निधीचीमागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे,

( ४) कालबध्द पध्दतीने पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे.

(५) तसेच प्रवाशांची यात्रेदरम्यान सुरक्षा व आरोग्याच्या संबंधित संपूर्ण व्यवस्था योग्य प्रकारे सुनिश्चित करणे..Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024

सदर योजनेची नवीन वेबसाईट तयार करण्याचे काम चालू झालेले आहे महाराष्ट्र सरकार तर्फे हे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे सोपवण्यात आलेले आहे व लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळ तयार करून घेण्यात येणार आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra 2024 Notification

योजना अधिकृत जाहिरात (PDF) पहा. येथे क्लिक करा.
Daily योजना अपडेट्स पहा.येथे क्लिक करा.
नोकरी ग्रुप जॉईन करा.येथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.येथे क्लिक करा.

टीप :- आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व योजना व भरती बद्दल सर्वात अधिक ची माहिती घेण्यासाठी वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ पाहायचे आहेत.

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना व नोकर भरती याबद्दलचे सर्व नवनवीन अपडेट्स आपण त्वरितच आपल्या ग्रुप वर शेअर करा तसेच mhjobwala.com ही वेबसाईट सर्वात वेगवान माहिती आपल्यापर्यंत पोहोचते व अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 या प्रकारची अनेक भरतींची व योजना ची माहिती तुम्ही तुमच्या गरजू गव्हाच्या मित्रांना व अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरात लवकर आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व आमच्या लगेचच आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा त्यावर सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद…!!

For Feedback - feedback@example.com
Join Our WhatsApp Channel

Leave a Comment