Information Of Anganwadi Supervisor 2024 : नमस्कार मित्रांनो सुवर्णसंधी,आज आपण आपल्या लेखामध्ये अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षक या पदांच्या अभ्यासक्रमाबद्दल खालील महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे समावेश असणार आहे. आज आपण आपल्या लेखांमध्ये अंगणवाडी सुपरवायझर साठी कोणकोणत्या शैक्षणिक पात्रता किंवा इतर पात्रता असतात याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही अंगणवाडी सुपरवायझर व्हायचे असेल तर हे सर्व माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी कोणकोणत्या शैक्षणिक पात्रता असतात या पदासाठी कोणकोणते अभ्यासक्रम असतात याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ती खालील प्रमाणे.
Information Of Anganwadi Supervisor 2024 अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम :
अंगणवाडी सुपरवायझर ज्याला अंगणवाडी पर्यवेक्षिका असे हे म्हटले जाते या पदाची भरती जिल्हा परिषद अंतर्गत घेतली जाते ही भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याची असल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सुपरवायझरच्या रिक्त पदांची भरती राज्य स्तरावर ती संयुक्तपणे घेतली जाते अशी संयुक्तपणे भरती 2019 मध्ये घेण्यात आली आहे यावेळी एकच कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधील अंगणवाडी सुपरवायझर पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात त्यामधील प्रत्येक प्रश्न दोन मार्कांसाठी विचारला जातो अशा प्रकारे एकूण ही परीक्षा 200 गुणांची असते तसेच या परीक्षेमध्ये एकूण चार विषय असतात ते खालील प्रमाणे.
Information Of Anganwadi Supervisor 2024 अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती परीक्षा अंतर्गत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता हे चार विषय असतात प्रत्येक विषयावरती आधारित 25 प्रश्न विचारले जातात त्यामधील प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी विचारला जातो अशा पद्धतीने चार विषयांवर आधारित 100 प्रश्नांच्या आणि 200 गुणांची परीक्षा घेतली जाते.
- मराठी – मराठी या विषयासाठी एकूण 25 प्रश्न विचारले जातात त्यांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 50 गुण असतात हे प्रश्न मराठी मधून विचारले जातात ज्याची काठिण्य पातळी इयत्ता 12 वी असते
- इंग्रजी – इंग्रजी या विषयावर आधारित 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातात हे प्रश्न साहजिकच इंग्रजी मधून विचारले जातात याची काठिण्य पातळी पदवी इतकी असते
- सामान्य ज्ञान – या विषयावर आधारित प्रश्न 25 विचारले जातात त्यांना 50 गुण दिले जातात. या विषयाचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधून विचारले जातात ज्याची काठीने पातळी पदवी इतकी असते
- गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी – गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती एकूण 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातात याचे भाषा माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही असते आणि काठिण्य पातळी पदवी इतकी असते.
आतापर्यंत आपण अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षेमध्ये किती विषय असतात आणि किती गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाते हे पहिले आता अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी वरील प्रमाणे मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे चार विषय असतात यामधील सामान्य ज्ञान या विषयाबद्दल बहुतेक उमेदवारांना अडचण असते म्हणून सामान्य ज्ञान या विषयांमधील अशा महत्त्वपूर्ण घटकांची माहिती घेणार आहोत यावरती तुमचे मेरिट आणि सिलेक्शन अवलंबून असते.
Information Of Anganwadi Supervisor 2024 अंगणवाडी सुपरवायझर आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सामान्य ज्ञान म्हटले जाते की बहुतेक उमेदवारांना असे वाटते की यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान संगणक किंवा चालू घडामोडी अशा प्रकारचे विषय असतील जे तलाठी भरती पोलीस भरती ग्रामसेवक भरती अशा प्रकारच्या सर्व स्पर्धा परीक्षांना असतात मात्र सामान्य ज्ञानाच्या या विषयावर सोबतच आणखीन काही महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास देखील अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करत असणारा उमेदवारांना करावा लागतो.
तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती यासारख्या भर स्पर्धा परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाचा अभ्यास तुम्हाला करायलाच हवा मात्र तुम्हाला सामान्य ज्ञानाच्या पुढील काही महत्त्वपूर्ण घटकांचा देखील अभ्यास करणे फायदेशीर ठरते कारण हाच अभ्यास तुम्हाला इतर उमेदवारांपेक्षा सरस ठरवण्यात मदत करतो.
सामान्य ज्ञान विषयांमधील महत्त्वाचे घटक :
- अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांच्या परीक्षेमध्ये खालील घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात ते खालील प्रमाणे.
- बालक पोषक आहार संबंधित प्रश्न
- साम शासन किंवा सरकारमार्फत राबवले जाणाऱ्या बालकां संदर्भातील जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध योजना आणि त्यासंबंधीत बनवण्यात आलेले विविध कायदे यासंबंधी प्रश्न.
- बालकांच्या आजारासंबंधी माहिती वरती प्रश्न
- शिक्षणासंबंधी प्रश्न किंवा सरकार मार्फत बनवण्यात आलेल्या विविध तरतुदी आणि योजनांवर आधारित प्रश्न तसेच त्यासंदर्भातील चालू घडामोडी.
- आहार, शिक्षण, योजना आणि वरील सर्व घटकांशी निगडित असणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात. Information Of Anganwadi Supervisor 2024
Information Of Anganwadi Supervisor 2024 पर्यवेक्षिका पात्रता :
- अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी उमेदवारांकडे खालील दोन पर्याय उपलब्ध असतात.
- अंतर्गत भरती मार्फत अंगणवाडी सुपरवायझर होणे
- सरळ सेवा भरती मार्फत अंगणवाडी सुपरवायझर होणे
अंतर्गत भरती अंगणवाडी सुपरवायझर होणे :
अंतर्गत भरतीने अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी संबंधित अर्जदार महिला किमान पदवीधर असणे आवश्यक आहे या सोबतच त्या महिलेला अंगणवाडी सेविका या पदावर ती काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
Information Of Anganwadi Supervisor 2024 पात्रता :
- अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात
- अंगणवाडी सुपरवायझर केव्हा पर्यवेक्षिका या पदांसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित महिला उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे
- अंगणवाडी सेविका असलेली महिला उमेदवार सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती दोन्ही पद्धतीने फॉर्म भरू शकते
- अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका या पदांसाठी अंतर्गत भरती मधून अर्ज करण्यासाठी उमेदवार महिलेला अंगणवाडी सेविका या पदावर ते काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे जर दहा वर्षाचा अंगणवाडी सेविका पदाचा अनुभव नसेल तर अशावेळी सरळसेवा पद्धतीने फॉर्म भरता येऊ शकतो
- अंगणवाडी सुपरवायझर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अंतर्गत भरती मार्फत अर्ज करणारी महिला उमेदवार या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज करू शकते या जिल्ह्यामध्ये या महिलेने अंगणवाडी सेविका म्हणून काम केले आहे आणि या पदावर ते काम केल्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव आहे.
- संगणक ज्ञान आवश्यक आहे. Information Of Anganwadi Supervisor 2024
Information Of Anganwadi Supervisor 2024 वयोमर्यादा :
- किमान 18 वर्षे ते कमाल 45 वर्षे.
सरळसेवा भरतीने अंगणवाडी सुपरवायझर होणे :
सरळ सेवा भरती ने अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी उमेदवारांना अंगणवाडी सुपरवायझर पदाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करणे आवश्यक आहे आणि अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा कोणत्याही शाखेमधून पदवीधर झालेली महिला उमेदवार देऊ शकते सरळसेवा भरतीने अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहेत.
पात्रता :
- केवळ महिला उमेदवार अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी अर्ज करू शकतात
- अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी सरळ सेवा भरती मधून अर्ज करण्यासाठी महिला उमेदवार कोणत्याही शाखेमधून किमान पदवीधर असणे गरजेचे आहे
- संगणक ज्ञान आवश्यक आहे Information Of Anganwadi Supervisor 2024
Information Of Anganwadi Supervisor 2024 वयोमर्यादा :
- खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
- ओबीसी प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
- अपंग/ प्रकल्पग्रस्त/ स्वातंत्र्यसैनिक – 18 ते 45 वर्षे
- अंशकालीन कर्मचारी – 18 ते 55 वर्षे
सैन्य दलात कसे सामील व्हायचे ?
FAQ :
अंगणवाडी सुपरवायझर साठी शैक्षणिकपात्रता काय आहे ?
अंगणवाडी सुपरवायझर साठी कोण अर्ज करू शकतो ?
📰 Daily महाराष्ट्रातील नोकर भरती बघण्यासाठी… | येथे क्लिक करा |
.🟩 व्हाट्सअप Group ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा |
🔵 टेलिग्राम चैनल ला जॉईन करण्यासाठी… | येथे क्लिक करा |